राज्यातील १० हजार पोलिसांची भरती आक्टोबर महिन्यातच होणार
राज्यातील पोलीस दलातील जानेवारी- २०२४ आणि डिसेंबर- २०२५ अखेर रिक्त होणाऱ्या पदांची माहिती गृह विभागाच्या प्रशिक्षण व खास पथकाच्या अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयाने संकलित केली असून येत्या आक्टोबर महिन्यात १० हजार पोलीस शिपाई पदांची भरती करण्यासाठी मंजुरीसाठी गृह विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. पावसाळ्यानंतर म्हणजेच आक्टोबर महिन्यात भरती प्रक्रियेला सुरुवात होणार असून सदरील पदभातीच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला असून सुरुवातीला मैदानी आणि त्यानंतर मुंबई वगळता राज्यात एकाचवेळी लेखी परीक्षा घेण्यात येणार असल्याचे समजते.
सदरील आगामी होणाऱ्या भरती प्रक्रियेत पोलीस शिपाई, बॅन्ड्समन,चालक शिपाई आणि राज्य राखीव पोलीस दलातील अंमलदार पदांच्या जागा भरण्यात येणार असून डिसेंबर २०२५ अखेर पोलीस दलातील पोलिसांची सुमारे १० हजार पदे रिक्त होणार असल्याने सदरील पदे आक्टोबर महिन्यातच भरण्यासाठी राज्य सरकारच्या गृह विभागास प्रस्ताव सादर करण्यात आला असून मंजुरी मिळाल्यानंतर लगेचच भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. सदरील भरती प्रक्रियेत उमेदवारांना एकाच जिल्ह्यात एकच अर्ज करता येणार असून अर्जाचे शुल्क एक हजार रुपये एवढे असणार आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!