नवोदय विद्यालय समिती मार्फत कंत्राटी शिक्षक पदाच्या ३७० जागा
नवोदय विद्यालय समिती, विभागीय कार्यालय, पुणे अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या विविध जवाहर नवोदय विद्यालयाच्या आस्थापनेवरील पीजीटी, टीजीटी, बहुगुणी शिक्षक आणि एफसीएसए पदाच्या ३७० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्राथमिक पदवीधर शिक्षक पदाच्या १२८ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह एम.ए./ एम.एस्सी./ एम.कॉम./ बी.ई./ बी.टेक/ एम.सी.ए./ बी.सी.ए./ बी.एस्सी. (संगणक) किंवा समतुल्य आणि बी.एड. अर्हता धारक असावा.
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक पदाच्या १७२ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह संबंधित विषयातील पदवीधारक आणि बी.एड. अर्हता धारक असावा.
शिक्षक प्रणाली प्रशासक पदाच्या ७० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर व कॉम्पुटर ॲप्लिकेशन डिप्लोमा किंवा बी.सी.ए. किंवा बी.टेक/ बी.ई.(संगणकशास्त्र/ आयटी/ माहिती आणि तंत्रज्ञान) अर्हता धारक असावा.
नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दीव-दमण, दादरा आणि नगर हवेली.
फीस – नाही
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – ५ जून २०१९ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आमच्या navajowhite-sardine-438152.hostingersite.com संकेतस्थळाला भेट द्या !
Comments are closed.