नोंदणी व मुद्रांक विभाग भरती ऑनलाईन परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध

महाराष्ट्र सरकारच्या अधिनस्त असलेल्या नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य यांच्या आस्थापनेवरील ‘गट-ड’ संवर्गातील शिपाई पदांच्या २८४ जागा भरण्याकरिता दिनांक १ जुलै २०२५ ते दिनांक ८ जुलै २०२५ दरम्यान ऑनलाईन पद्धतिने परीक्षा घेण्यात येणार असून सदरील परीक्षेची प्रवेशपत्र/ ऍडमिट कार्ड उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती सोबत खाली दिलेल्या संबंधित वेबसाईट लिंकद्वारे पाहता/ डाऊनलोड करता येतील.

तसेच प्रवेशपत्र/ ऍडमिट कार्ड उमेदवारास त्यांच्या नोंदणीकृत ई-मेलवर आयबीपीएस मार्फ़त पाठविण्यात येणार आहे. सदर परीक्षेकरीता विभागाकडून कोणत्याही इतर एजन्सीची वा मध्यस्थाची नेमणूक करण्यात आलेली नाही. जर याबाबत कोणती व्यक्ती, संस्थेकडून, मध्यस्थ अथवा तशी बतावणी करण्यात येत असल्यास अशा व्यक्ती वा संस्थेपासून उमेदवारांनी कृपया सावध राहावे, असे आवाहन नोंदणी व मुद्रांक विभागातर्फे करण्यात येत आहे.

प्रवेशपत्र डाऊनलोड करा

शुद्धिपत्रक पहा

व्हॉट्सअप जॉईन करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});